Kitchen Tips : कोणत्या भाज्या फ्रिजमध्ये कुठे ठेवाव्यात?
Lifestyle Jan 23 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
फ्रिजमध्ये भाज्या कुठे ठेवाव्यात?
घरातील फ्रिजमध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू ठेवतो. अन्नपदार्थ ते भाज्या ताज्या राहण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. पण फ्रिजमध्ये कोणत्या भाज्या कुठे ठेवाव्यात हे माहितेय का?
Image credits: social media
Marathi
फ्रिजमधील ड्रॉवरचा वापर
भाज्या ठेवण्यासाठी फ्रिजमधील ड्रॉवरचा वापर करू शकता. येथील तापमान भाज्यांसाठी उत्तम असते. यामुळे भाज्या दीर्घकाळ फ्रेश राहतात.
Image credits: Social media
Marathi
गाजर किंवा मुळा कुठे ठेवावा?
गाजर आणि मुळ्यासारख्या भाज्या दीर्घकाळ टिकवून राहण्यासाठी फ्रिजमधील ड्रॉवरचा किंवा क्रिस्परचा वापर करू शकता. या भाज्या प्लास्टिक बॅगमध्ये भरून ठेवा.
Image credits: Getty
Marathi
टोमॅटो किंवा काकडी
फ्रिजमध्ये वरच्या बाजूच्या भागात टोमॅटो किंवा काकडी ठेवू शकता. असे केल्याने काकडी-टोमॅटो दीर्घकाळ फ्रेश राहतात.
Image credits: Getty
Marathi
फळ आणि भाज्या एकत्रित ठेवण्याचे नुकसान
फळ आणि भाज्या कधीच फ्रीजमध्ये एकत्रित ठेवू नये. फळांमधून पडणाऱ्या गॅसमुळे भाज्या लवकर खराब होऊ शकतात.
Image credits: Pinterest
Marathi
आलं आणि लिंबू कुठे ठेवावे?
आलं आणि लिंबूसारख्या भाज्या फ्रिजमध्ये अंडी ठेवण्याच्या सेक्शनमध्ये ठेवू शकता.
Image credits: Social media
Marathi
कोणत्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नये?
बटाटे, कांदा किंवा लसूणसारख्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे भाज्या खराब होऊ शकतात.