मुळ्याची भाजी, कांदा, मिरची, किसलेले खोबरे, चवीनुसार मीठ आणि तेल
सर्वप्रथम मुळा आणि त्याचे पाने स्वच्छ धुवून घ्या. यानंतर बारीक आकारात मुळा पानांसह कापून ठेवा.
कढईमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये चिरलेला कांदा, मिरची घाला. यानंतर तेलामध्ये चिरलेली मुळ्याची भाजी घालून परतून घ्या.
मुळ्याची भाजी 10-15 मिनिटे शिजवत ठेवा. यावेळी भाजीमध्ये पाणी अजिबात घालू नका. खरंतर, भाजी वाफवल्यानंतर त्याला पाणी सुटते.
मुळ्याची भाजी वाफवल्यानंतर त्यावरुन किसलेले ओले खोबरे घालून पुन्हा परतून घ्या. अशाप्रकारे डब्यासाठी मुळ्याची भाजी तयार होईल.