मान्सूनमध्ये इगतपुरीला मित्रपरिवारासोबत ट्रिपसाठी जाऊ शकता. येथे ट्रेक ते धबधब्यांचा आनंद लुटता येईल.
वायनाड येथे दरवर्षी तुफान पाऊस पडतो. पावसाळ्यातील ट्रिपचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी तुम्ही वायनाडला नक्की भेट देऊ शकता. येथील निसर्ग तुमच्या ट्रिपची मजा नक्कीच द्विगुणीत करेल.
माळशेज घाटात पावसाळ्यातील दृष्ट पाहण्याजोगे असते. घाटातून जाताना लागणारे झरे तुम्हाला आकर्षित करतात.
चेरापुंजीत तुम्हाला धबधबे, रुट ब्रिज आण गुहा पाहायल मिळतील. या ठिकाणी मॉन्सूनमधील वातावरण निसर्गरम्य असते.
भंडारदरा येथे बहुतांशजण पावसाळ्यात ट्रेकची मजा लुटतताच. याशिवाय हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत आल्यानंतर धावपळीच्या आयुष्यातील ताण कमी झाल्यासारखा वाटतो.
दुग्धसागर वॉटरफॉलचा नजारा पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. दुग्धसागरचीही ट्रिप तुम्हाला अगदी कमी खर्चात करता येईल.
शिलाँगला जाण्याचा उत्तम कालावधी जून ते सप्टेंबर असल्याचे मानले जाते. या कालावधीत पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात मजा लुटण्याचा आनंद घेता येतो.
कर्नाटकातील कुर्ग येथे तुम्ही पावसाळ्यात नक्की भेट देऊ शकता. येथील थंडगार वातावरणात तुम्हाला रिलॅक्स करण्याची वेगळीच मजा येईल.
लोणावळ्यात पावसाळ्याची मजा लुटण्याचा एक वेगळाच आनंद असतो. प्रत्येक वर्षी लोणावळ्यात पावसाळ्यावेळी मोहात पाडणारा निसर्ग आणि धबधब्यांची मजा लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.
कोलाड येथे रिव्हर राफ्टिंकची मजा लुटता येते. कोलाडची ट्रिप तुम्ही 3 हजार रुपयांत करू शकता.