पोटावर वाढलेल्या चरबीमुळे तुमचे व्यक्तिमत्वच नव्हे काही आजारपणही घेऊन येते. अशातच पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात.
दररोजच्या खाण्यापिण्यात तुम्ही अशा गोष्टींचा समावेश करा जे फॅट लॉससाठी फायदेशीर ठरतील. यामुळे सहज पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासही मदत होईल.
पोटावरील चरबी वेगाने कमी करण्यासाठी एका खास चहाचे सेवन करु शकता. याचा नक्कीच फायदा होईल. याबद्दलच जाणून घेऊया पुढे...
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी जीरे, बडीशेप, हळद आणि धणे मिक्स करुन खास चहा तयार करू शकता.
चहा तयार करण्यासाठी अर्धा चमचा बडीशेप, चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा धणे दोन कप पाण्यात उकळवून घ्या. यानंतर पाणी गाळून दररोज रात्री झोपण्याआधी प्या.
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी तयार केलेली खास चहा सूज कमी करणे आणि उत्तम झोपेसाठीही फायदेशीर ठरते.