साडी या पोशाखाचा जन्म कसा झाला? जाणून घेऊया इतिहास
साडी हा भारतीय महिलांचा एक पारंपरिक पोशाख आहे. परदेशी महिलांनाही साडी नेसायला फार आवडते. पण साडीचा इतिहास किती वर्षे जुना आहे, माहितीये?
साडी या पोशाखाचा शोध कसा-केव्हा लागला, याबाबत निश्चित तारीख सांगणे कठीण आहे. पण या पोशाखाचे मूळ सिंधू संस्कृतीच्या काळात 2800-1800 इ.स.पूर्व प्राचीन भारतात आढळून आले, असे म्हणतात.
सिंधू खोऱ्यातील उत्खननादरम्यान कापडात गुंडाळलेली शिल्प सापडली होती, या मूर्तींभोवती कापड गुंडाळलेले दिसले. ज्यावरून प्राचीन भारतात कपडे परिधान करण्याची पद्धत समजली.
इतिहासासह साडी पोशाखाचाही विकास झाला. वेदांमध्येही साडीचा उल्लेख आढळतो. वैदिक कालखंडात कपड्यांच्या शैलीत बदल झाला, ज्यात महिलावर्ग न शिवलेले कपडे परिधान करत असल्याचा उल्लेख आहे.
‘सट्टिका’ या संस्कृत शब्दातून ‘साडी’ या शब्दाचा जन्म झाला आहे, असे म्हटलं जाते. याचा अर्थ म्हणजे अंगाभोवती गुंडाळले जाणारे कापड.
आता वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर-सुंदर साड्या बाजारात उपलब्ध आहेत. पैठणी, बनारसी, शालू, चंदेरी इत्यादी साड्यांचे असे कित्येक प्रकार आज पाहायला मिळतात.
साडी नेसण्याच्या 80पेक्षा जास्त पद्धती आहेत, अशी माहिती आहे. सामान्यतः साडी कमरेभोवती गुंडाळून पदर खांद्यावर घेतात. पण तरीही साडी हा पोशाख वेगवेगळ्या पद्धतीने परिधान केला जाऊ शकतो.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.