काही लोकांना पायावर पाय ठेवून बसण्याची सवय असते. बसण्याची ही पद्धत दिसायला स्टायलिश असली तरीही आरोग्याच्या दृष्टीकोनातून तुमची ही सवय हानिकारक ठरू शकते.
काही महिला तसंच पुरुषांनाही पायावर पाय ठेवून बसण्याची सवय असते. कारण अशा पद्धतीने बसणं त्यांच्यासाठी सोयीचे असू शकते. पण तुमची ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे लक्षात घ्या.
काही रीसर्चमधील माहितीनुसार पायावर पाय ठेवून बसण्याच्या सवयीमुळे शरीराचे पोश्चर बिघडण्याव्यतिरिक्त अन्य शारीरिक समस्याही उद्भवतात.
शरीरातील रक्तप्रवाहाच्या प्रक्रियेतही अडचणी निर्माण होतात. पायावर पाय ठेवून बसल्यास या भागातील धमण्यापर्यंत रक्ताचा पुरवठा होत नाही. यामुळे रक्त गोठण्याची समस्या निर्माण होऊ लागते.
रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होत असल्याने हृदयावरही ताण येतो. यामुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते.
या सवयीमुळे शरीरातील स्नायूंवरही वाईट परिणाम होतात. ज्यामुळे पाय दुखणे, पाय सुजणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.
पायावर पाय ठेवून बसल्याने शरीराचे पोश्चर बिघडू लागते. मानेवरही याचा परिणाम होतो. तसंच पाठीच्या कण्याची खालील बाजू, खांदे आणि ओटीपोटाजवळील हाडांवरही परिणाम होण्याची शक्यता असते.
रीसर्चनुसार अशा पद्धतीने बसल्यास मांड्या व नितंबावर वाईट परिणाम होतो. कारण तुम्ही ज्या पद्धतीने शरीराला वळण लावाल त्याचेच सकारात्मक व नकारात्मक परिणाम शरीरावर पाहायला मिळतील.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.