दोन वाट्या मैदा, एक चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, एक वाटी पीठी साखर, अर्धी वाटी लोणी, वेलची पावडर, जायफळ पूड, सुका मेवा. व्हॅनिला ईसेन्स आणि दूध
सर्वप्रथम दोन वाट्या मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्रित मिक्स करुन चाळून घ्या.
पाऊण वाटी पीठी साखर आणि अर्धी वाटी लोणी फेटून घ्या. यामध्ये वेलची पावडर, जायफळ पूड, सुका मेवा, व्हॅनिला ईसेन्स व मैदा घालून फेटून घ्या.
मिश्रण घट्ट असावे. यामुळे मिश्रणात दूध घालताना लक्ष द्या.
कुकरची शिट्टी आणि रिंग काढून त्यामध्ये अर्धी वाटी मीठ पसरवून घाला. त्यानंतर एक वाटी पालथी ठेवून आधी झाकण लावून गरम करून घ्या.
केकचे तयार मिश्रण ग्रीस केलेल्या व मैदा स्प्रिंकल केलेल्या भांड्यात भरा. यावरुन सुका मेवाही घाला.
कुकरचे झाकण लावून 45-50 मिनिटे मध्यम आचेवर केक शिजण्यासाठी ठेवा.
कुकर थंड झाल्यानंतर त्यामधील केक काढून चहासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
अंड की पनीर, वजन कमी करण्यासाठी काय खावे?
फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी डाएटमध्ये करा या 4 फूड्सचा समावेश
20 रुपयांत चमकेल Gold-Silver ज्वेलरी, वाचा खास ट्रिक्स
घामामुळे केसांना येणारी दुर्गंधी कशी दूर करावी?