तोंडात विरघळेल असा रसगुल्ला बनवा घरच्या घरी, कृती जाणून घ्या
Lifestyle Jan 13 2025
Author: vivek panmand Image Credits:Freepik
Marathi
रसगुल्ला हा चविष्ट पदार्थ असतो
रसगुल्ला हा हलकासा, रसाळ आणि चविष्ट भारतीय गोड पदार्थ आहे, जो झटपट घरी बनवता येतो. खाली रसगुल्ला बनवण्याची सोपी रेसिपी दिली आहे.
Image credits: Freepik
Marathi
साहित्य
दूध: 1 लिटर (फुल क्रीम)
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर: 2 टेबलस्पून साखर
1 कप पाणी
4 कप वेलची पूड: 1/4 टीस्पून
Image credits: Freepik
Marathi
दुधाचे पनीर तयार करा
का मोठ्या भांड्यात दूध गरम करा आणि उकळून घ्या. दूध उकळल्यानंतर त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला आणि चमच्याने हलवत रहा. दूध फाटून पनीर वेगळे होईल.
Image credits: Freepik
Marathi
पनीर कपड्यात बांधून ठेवा
पनीर वेगळं झाल्यावर मलमलच्या कपड्याने गाळा आणि थंड पाण्याने धुवा, म्हणजे लिंबाचा वास निघून जाईल. पनीर कपड्यात बांधून 15-20 मिनिटे टांगून ठेवा, म्हणजे उरलेले पाणी निघून जाईल.
Image credits: Freepik
Marathi
पनीरचे गोळे बनवून साखरेचा पाक तयार करा
तयार पनीर एका मोठ्या प्लेटमध्ये घ्या आणि मऊ होईपर्यंत 5-7 मिनिटे मळा. त्यानंतर छोटे छोटे गोळे तयार केल्यानंतर साखरेचा ताक तयार करून घ्या.
Image credits: Freepik
Marathi
पनीरचे गोळे तयार करून ठेवा
साखरेच्या पाकात पनीरचे गोळे टाकून द्या. गॅस मध्यम आचेवर ठेवून झाकण लावून 15 मिनिटे शिजवा. पनीराचे गोळे फुगून मोठे होतील.
Image credits: Freepik
Marathi
थंड करा आणि सर्व्ह करा
रसगुल्ल्यांना थंड होण्यासाठी 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवा. थंडसर रसगुल्ला वाढण्यासाठी तयार आहे!