Marathi

कांदा खाल्याने तोंडाचा वास का येतो, काय आहे कारण?

Marathi

सल्फरयुक्त संयुगे

कांद्यामध्ये सल्फर कंपाऊंड्स मोठ्या प्रमाणावर असतात. कांदा चावल्यावर किंवा कापल्यावर त्यामधील अ‍ॅलिल प्रोपाइल डिसल्फाइड आणि थायोसल्फिनेट्स हे रसायने मुक्त होतात.

Image credits: instagram
Marathi

पचनानंतर होणारा प्रभाव

कांद्यातील सल्फरयुक्त घटक पचनप्रक्रियेनंतर रक्तप्रवाहात मिसळतात. हे घटक फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात आणि श्वासाद्वारे बाहेर पडतात, ज्यामुळे वास दीर्घकाळ टिकतो.

Image credits: social media
Marathi

बॅक्टेरियांचा परिणाम

तोंडातील बॅक्टेरिया कांद्याच्या उरलेल्या कणांवर कार्य करतात, ज्यामुळे तोंडात दुर्गंधी निर्माण होते.

Image credits: social media
Marathi

कांदा खाल्यानंतर तोंडाचा वास कमी कसा करावा?

कांदा खाल्ल्यानंतर भरपूर पाणी प्यायल्यास तोंडातील उरलेले अन्नकण आणि सल्फरयुक्त घटक धुतले जाऊ शकतात. लिंबूमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.

Image credits: social media
Marathi

च्युईंग गममुळे वास कमी येतो

सुंठ, लवंग किंवा पुदिन्याची पाने चघळल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. च्यूइंग गममुळे तोंडात लाळेचे प्रमाण वाढते. 

Image credits: social media
Marathi

वास नियंत्रित कसा करावा?

कांद्यामधील नैसर्गिक सल्फर संयुगे आणि तोंडातील बॅक्टेरिया यामुळे तोंडाला वास येतो. मात्र, पाणी पिणे, लिंबूपाणी गुळणे, आणि पुदिन्याचा वापर केल्यास हा वास सहज नियंत्रित करता येतो. 

Image credits: social media

सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय करावं, तज्ज्ञ म्हणतात की

भोगीला आंघोळीच्या पाण्यात तीळ का घालतात? वाचा खास कारण

घनदाट आणि मऊ केसांसाठी कॉफीचा असा करा वापर

Makar Sankranti: मकरसंक्रांतीला पतंग का उडवली जाते, कारण जाणून घ्या