एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना अहिंसा हा परम धर्म आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने रामायण आणि महाभारतातील उदाहरण दिली होती.
प्रेमानंद महाराजांनी बोलताना म्हटलं आहे की, अहिंसा परम धर्म असून आपल्याला याच स्वरूप समजून घ्यावं लागेल. अहिंसेचा अर्थ सर्वात आधी सामाऊन घ्यायला हवा.
प्रेमानंद महाराजांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे की धर्माचे नुकसान होत असताना आपण त्याच रक्षण करत असू तर त्या हिंसेला अहिंसा असच म्हणावं लागेल.
प्रेमानंद महाराज सांगतात की, चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीला दंड देणं हे एक चांगलं काम आहे. त्यामुळे चुकीचा व्यक्तीला दंड दिल्यामुळे समाजात चांगला संदेश जातो.
प्रेमानंद महाराज म्हणतात की, एखादा पापी व्यक्ती खूप काळ जगला तर त्याच्यामुळे समाजाचे नुकसान होऊ शकत. हे काम पण अहिंसा असून आपण याला हिंसा समजू शकत नाही.
पण याचा अर्थ असा नाही की आपणच त्या व्यक्तीला दंड द्यायला हवा. हा दंड देण्याचं काम न्यायपालिलकेच असून त्या त्यांना सांगायला हवं.