गणेशोत्सवादरम्यान गणपतीची विधीवत पूजा केली जाते. यानंतर गणेश चतुर्थीला बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप दिला जातो.
अनंत चतुर्थीला बाप्पाचे विसर्जन करत त्याला निरोप दिला जातो. यावेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा घरातील सुख-समृद्धी दूर होऊ शकते.
विसर्जनावेळी चुकूनही काळ्या-निळ्या रंगातील वस्र परिधान करू नये. याशिवाय विसर्जनावेळी बाप्पाच्या पूजेला तुळस किंवा बेलपत्राचा वापर करू नये.
गणपतीचे विसर्जन शुभ मुहूर्तावर करावा. चुकूनही राहुकाळात गपणतीचे विसर्जन करू नये.
गणपतीच्या विसर्जनाआधी त्याची विधीवत पूजा करावी. गणपतीला निरोप देताना त्याच्यासोबत शिधाही ठेवण्यास विसरु नका.
विसर्जनावेळी गणपतीच्या मुर्तीचे मुख घरासमोर असावे. पाठमोरी गणपतीची मुर्ती ठेवू नये.
गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन पवित्र नदीत करावे. सध्या घरातच विसर्जन केले जात असल्याने यावेळी स्टील, तांबे किंवा लोखंडाच्या मोठ्या भांड्याचा वापर करावा.
घरात मुर्तीचे विसर्जन केल्यानंतर विरघळलेली माती झाडांना घालू शकता.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.