शिळ्या पोळ्या फेकण्याएवजी त्यापासून सोप्या आणि झटपट होणाऱ्या पुढील काही रेपिसी तयार करू शकता.
शिळ्या पोळ्यांपासून पिज्जा तयार करू शकता. लहान मुलांना आवडीने पिज्जा खायला आवडते. पिज्जा तयार करण्यासाठी पनीर, पिज्जा सॉस, कॉर्नचा आणि चीजचा वापर करू शकता.
शिळ्या पोळ्या बारीक कापून त्याला मोहरी, हिंग, मिरचीची फोडणी देत त्यापासून चपातीचा चुराची रेसिपी तयार करू शकता. सकाळच्या नाश्तासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे.
शिळ्या पोळ्या मिक्सरमध्ये वाटून त्यामध्ये साखर, तूप मिक्स करत लाडू तयार करू शकता.
शिळ्या पोळ्यांपासून खीर तयार करू शकता. या रेसिपीसाठी ड्रायफ्रुट्स, दूधाचा वापर करा.
शिळ्या पोळ्यांपासून पॅटिस तयार करण्यासाठी उकडलेले बटाटे, मिरची, कोथिंबीरचे मिश्रण तयार करा. मिश्रणाला ब्रेड क्रम्प्सने मॅरिनेट करत शॅलो फ्राय करा.
शिळ्या पोळ्यांपासून सँडविच तयार करू शकता. यासाठी भोपळी मिरची, टोमॅटो, कांदा, पिज्जा सॉस अथवा शेजवाज चटणीचा वापर करा.