प्राची देसाई प्रमाणेच, अगदी क्लासी दिसण्यासाठी तुम्ही ब्लॅक एल्बो स्लीव्हज ब्लाउजसह रॉयल ब्लू रंगाची साडी घालू शकता, ज्याला पातळ बॉर्डर आहे.
पूर्णपणे रॉयल आणि क्लासी लूकसाठी तुम्ही झिरो नेक फुल स्लीव्हज ब्लाउजसह काळ्या रंगाची साडी घालू शकता, ज्याला सिल्व्हर रंगाची बॉर्डर असेल तर आणखीनच उठून दिसेल.
तुम्ही ब्लॅक क्रॉप टॉप किंवा बंद नेक फुल स्लीव्हज ब्लाउजसह मौनी रॉयसारखी तपकिरी आणि काळ्या बेसमध्ये स्ट्रीप केलेली साडी घालू शकता. त्यासोबत बेल्ट घाला.
जर तुम्हाला काळ्या रंगाच्या फुल स्लीव्हज व्ही नेक ब्लाउजसह काही भारतीय प्रिंट घालायची असेल, तर तुम्ही या प्रकारच्या बांधणी प्रिंटची साडी घालू शकता
काळ्यासोबत पिवळा रंगही चांगला जातो. हे संयोजन अतिशय स्टाइलिश दिसते. पिवळ्या रंगाप्रमाणेच सेल्फ प्रिंट साडीला ब्लॅक कलरचा स्लीव्हलेस सिक्वेन्स ब्लाउज कॅरी करण्यात आला आहे.
लाल आणि काळा रंगाच कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसत. साध्या काळ्या रंगाच्या ब्लाउजवर लाल बॉर्डर असलेली किंवा पूर्ण लाल रंगाची साडी परिधान करून तुम्ही खूप क्लासी लुक मिळवू शकता.
काळ्या रंगाच्या प्लेन किंवा प्रिंटेड ब्लाऊजवर राणी रंगाची साडी आणखीच उठून दिसेल. याचबरोबर साजेल मेकअप आणि हलकी ज्वेलरी कॅरी केल्यास क्लासी लुक मिळेल
सगळ्यात जास्त घातल्या जाणाऱ्या कॉम्बिनेशन पैकी एक आहे ब्लॅक आणि गोल्डन. काळ्या रंगाच्या ब्लाउजवर मंद सोनेरी बनारसी साडी नेसून तुम्ही रॉयल लुक मिळवू शकता.
जर तुम्हाला साध्या काळ्या रंगाच्या स्लीव्हलेस ब्लाउजसह रेट्रो लुक हवा असेल, तर शिल्पा शेट्टीप्रमाणे तुम्हीही पांढऱ्या बेसमध्ये ब्लॅक पोल्का डॉट साडी घालू शकता.