घराच्या खिडक्या कोणत्या बाजूला असावे याबद्दल वस्तूशास्रमध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. घरात खिडक्या कोणत्या बाजूला असावेत याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला खिडकी असायला हवी. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येत जाते.
पूर्व दिशेला खिडकी असायला हवी. यामुळे घरात सौभाग्य यायला मदत होते. घरातील सदस्यांना यश आणि समृद्धी मिळायला मदत होते.
उत्तर दिशेला खिडकी असल्यावर कुबेराच्या संपत्तीचा लाभ मिळू शकतो. या दिशेला खिडकी असल्यास पैशांची कमी राहत नाही आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते.
दक्षिण दिशेला खिडकी असल्यास घरामध्ये आजारांच्या संख्येत वाढ होऊ शकते. या दिशेला यम असून इकडे खिडकी असल्यास अडचणींमध्ये वाढ होते.
घरामध्ये खिडकीला तडा गेलेला असेल तर आपल्या घरात अडचणी, दुःख आणि वाईट घटनांमध्ये वाढ होते. आपण जुन्या घराच्या खिडक्या नवीन घरात लावू नका.
आपल्या खिडकीच्या बाहेर डिश अँटेना, टॉवर किंवा एखादा खांब असेल तर आपण पडदे टाकून ठेवावेत, अन्यथा आपल्या घरात अडचणी निर्माण होऊ शकतात.