मुंबईत नवरात्रौत्सवाची धूम पहायला मिळत आहे. अशातच वेगवेगळ्या मंडळांच्या देवींचे आगमन नुकतेच झाले आहे. ताडदेवची माऊलीचेही आगमन झाल्याचे फोटो समोर आले आहेत.
शारदीय नवरात्रौत्सवावेळी देवीची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. याआधीच माझगावची आई माऊली म्हणून ओखळल्या जाणाऱ्या देवीच्या आगमनाची जोरदार मिरवणूक काढण्यात आली होती.
मुंबईतील सर्वाधिक देवीची उंच मुर्ती असणाऱ्या खेतवाडीची आईचे आगमन झाले. आगमन सोहळ्याला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
भांडुपची आई म्हणून ओखळल्या जाणाऱ्या देवीचाही आगमन सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला.
नवरात्रौत्सावेळी देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. यंदा धारावीची जगदंबा असूरावर स्वार होऊन आली आहे.
बाळकृष्णाला हातात घेतलेलया गोरेगावच्या महालक्ष्मीचा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात मुंबईत पार पडला.
साररस्त्याची माऊली म्हणून मुंबईत प्रसिद्ध अशा देवीचे आगमन झाले आहे. देवीच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सावेळी भाविकांची फार मोठी गर्दी होते.
मुंबईची माऊली म्हणून ओखळल्या जाणाऱ्या सायन कोळीवाड्याच्या देवीचा दिमाखात आमगन सोहळा पार पडला.
संकटकाळी धावणारी आणि नवसाला पावणारी अशी घाटकोरपरमधील भटवाडीची आई जगदंबेचा आगमन सोहळा पार पडला. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गुंदवलीची राजमातेचेही दिमाखात भाविकांनी स्वागत केले. आता 3 ऑक्टोंबरपासून सुरु होणाऱ्या नवरात्रौत्सावेळी देवीची मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाणार आहे.