घरी आलेल्या चिमुकलीसाठी वेदानुसार नाव ठेवायचा विचार करताय? पुढील काही नावे नक्की पाहा.
वेदिका नाव वैदिक परंपरेनुसार प्रेरित आहे. याचा अर्थ असा होतो की, पूजेची देवी.
देवी लक्ष्मीचे 71वे नाव तुष्टि आहे. हे नाव संस्कृत भाषेपासून प्रेरित आहे. याचा अर्थ शांती, संतुष्टी आणि आनंद असा होता.
हिंदू पौराणिक कथेनुसार देवी अदिती अनंत ब्रम्हांड आणि त्यासंबंधित शक्तींपैकी एक आहे. संस्कृत भाषेतून हे नाव घेण्यात आले आहे.
ख्याति म्हणजेच प्रसिद्धी असा होतो. राजा दक्षच्या मुलीचे नाव ख्याति होते जी ऋषि भृगु यांची पत्नी होती.
प्रकृति म्हणजेच निसर्ग असा होता. सध्या बदलत्या काळातही पारंपारिक नाव कॉमन आहे.
अक्षयाचा अर्थ असा होतो की, अतुल्य आणि लक्ष्मी. मुलीला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते.
दिविष्टि एक युनिक नाव असून याचा अर्थ भक्ती असा होतो.
अक्रिया नावाचा अर्थ सन्मान आणि प्रशंसा असा होतो.