3 ऑक्टोंबर, गुरुवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. या दिवशी कलश स्थापन करण्यासाठी 6 शुभ मुहूर्त आहेत. याबद्दलच पाहूया पुढे...
कलश स्थापनेसाठी 3 ऑक्टोंबरला सकाळी 06 वाजून 15 मिनिटांपासून ते 07 वाजून 22 मिनिटांपर्यंतचा मुहूर्त असणार आहे. विद्वानांनुसार हा मुहूर्त सर्वाधिक शुभ आहे.
घटस्थापनेसाठी सकाळी 11 वाजून 46 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत अभिजीत मुहूर्त आहे.
3 ऑक्टोंबरला सकाळी 10 वाजून 41 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत कलश स्थापना करता येऊ शकते.
कलश स्थापनेसाठी 3 ऑक्टोंबरला दुपारी 12 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी 01 वाजून 38 मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे.
3 ऑक्टोंबरला संध्याकाळी 4 वाजून 36 मिनिटांपासून ते 06 वाजून 04 मिनिटांपर्यंत कलश स्थापना करता येऊ शकते.
एखाद्याला कारणास्तव दुपारी घटस्थापना करू शकत नसल्यास त्यांनी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांपासून ते 07 वाजून 36 मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त पाहू शकता.