देशभरात सध्या दिवाळीच्या उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करतात. पण फटाक्यामुळे डोळे जळजळ करत असल्यास पुढील काही उपाय करू शकता.
अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असलेल्या काकडीचा वापर डोळ्यांना होणाऱ्या इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करेल. काकडीचे टोनर तयार करून डोळ्यांवर स्प्रे केल्यासही डोळे जळजळ करणे थांबतील.
औषधीय गुणधर्म असणाऱ्या कडुलिंबाचा अर्क डोळे जळजळ करण्यावर बेस्ट उपाय आहे. यासाठी कडुलिंबाची पाने वाटून त्याचा अर्क काढून घ्या.
डोळे सातत्याने जळजळ करत असल्यास सर्वप्रथम डॉक्टरांना भेटा. याशिवाय थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. यामुळेही डोळ्यांना आराम मिळेल.
दिवाळीतील फटाक्यांमुळे डोळ्यांची जळजळ होत असल्यास बर्फाचा वापर करू शकता. बर्फाचे पाणी डोळ्यांवर लावल्याने डोळ्यांना थंडावा मिळेल.
डोळ्यांना थंडावा मिळावा म्हणून गुलाब पाण्याचा वापर करू शकता. याचा वापर केल्याने खाज येण्याची समस्या किंवा त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते.