Lifestyle

165Cr चा हिऱ्यांचा हार ते 450Cr चा व्हिला, इशा अंबानीचे आलिशान आयुष्य

Image credits: social media

90 कोटी रुपयांचा लेहेंगा

ईशा अंबानीने वर्ष 2018 मध्ये व्यावसायिक आनंद पिरामल यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. यावेळी ईशाने अत्यंत सुंदर आयव्हरी रंगातील लेहेंगा परिधान केला होता. याची किंमत 90 कोटी रुपये होती.

Image credits: social media

ईशा अंबानीची महागडी ज्वेलरी

ईशा अंबानीने मेट गाला 2019 मध्ये जांभळ्या रंगातील सुंदर असा डिज्नी प्रिंसेससारखा गाउन परिधान केला होता. यावेळी अनकट असा हिऱ्याचा नेकलेस गळ्यात घातला होता.

Image credits: social media

450 कोटी रुपयांच्या व्हिलाची मालकीण

मुंबईतील वरळी येथे पाच मजली ईशाचा व्हिला आहे. ईशा अंबानीला व्हिला सासऱ्यांनी लग्नात गिफ्ट दिला होता. याची किंमत 452 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

Image credits: social media

ईशा अंबानीची डॉल बॅग

गेल्या वर्षी मेट गालावेळी ईशा अंबानीने काळ्या रंगातील सुंदर असा सॅटिन गाउन परिधान केला होता.  यावेळी गुची ब्रँडची डॉल स्टाइल बॅग इशाने कॅरी केली होती. याची किंमत 24 लाख रुपये आहे.

Image credits: social media

रॉल्स-रॉयस कलिननची मालकीण आहे ईशा

ईशाच्या कार कलेक्शनमध्ये आलिशान रॉल्स-रॉयस कलिनन कार देखील आहे. याची किंमत 6.95 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

Image credits: social media

10 कोटी रुपयांची आलिशान कार

ईशा अंबानीकडे आलिशान कारचे कलेक्शन आहे. तिच्याकडे मर्सिडीज बेंज एस क्लास गार्ड कार आहे. या कारची किंमत 10 कोटींच्या आसपास आहे.

Image credits: social media

165 कोटी रुपयांचा अनकट डायमंड नेकलेस

ईशा अंबानीला वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी घालणे फार पसंत आहे. ईशाच्या गळ्यात एकदा अनकट डायमंड नेकसल पाहिला गेला. या नेकलेसची किंमत 165 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

Image credits: social media