यंदा दीप अमावस्या येत्या 4 ऑगस्टला आहे. यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यातील सणावारांना हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.
दीप अमावस्येला दीप पूजन केले जाते. या दिवशी घरातील पितळेचे, चांदीचे दिवे स्वच्छ करुन प्रज्वलित केले जातात. याशिवाय कणकेच्या पीठाचेही दिवे लावले जातात.
अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि दान-पुण्य केले जाते. दीप अमावस्येला पितरांसाठी कणकेचा दीवा दक्षिण दिशेला लावावा. यामुळे पितरांची पूजा केल्यासारखे होते.
अमावस्या 3 ऑगस्टला दुपारी 3.50 वाजता सुरू होणार असून 4 ऑगस्टला संध्याकाळी 4.42 मिनिटांनी संपणार आहे.
श्रावण महिना सुरू झाल्यानंतर मांसाहार केला जात नाही. त्याआधी गटारी अमावस्या साजरी केली जाते. गटारी अमावास्येला खरंतर 'गतहारी अमावस्या' असे म्हटले जाते.
दीप अमावस्येला दीपदान करण्याचे विशेष महत्व आहे. या दिवशी धन-समृद्धी टिकून राहण्यासह अकाली मृत्यू टाळण्यासह काही कारणांसाठी दीपदान केले जाते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.