यंदा गटारी येत्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. या दिवशी बहुतांशजणांच्या घरी नॉन-व्हेजचा बेत केला जातो. यंदाच्या गटारीला पुढील काही चिकनच्या 5 स्पेशल रेसिपी तयार करू शकता.
नागपूर स्टाइल सावजी चिकनसाठी गरम मसाले, लाल तिखट, चिकन, कांदा-खोबऱ्याच्या वाटणापासून तयार केले जाते. यंदाच्या गटारीला तुम्ही सावजी चिकनची रेसिपी तयार करू शकता.
खर्डा चिकनसाठी आलं, लसूण-कोथिंबीर पेस्ट, दही, हिरव्या मिरचीसह चिकनचा वापर केला जातो. झणझणीत चिकन खाण्याचा बेत करायचा असल्यास यंदाच्या गटारीला खर्डा चिकन तयार करू शकता.
काळं चिकन तयार करण्यासाठी सुकं खोबऱ्याचे वाटण, गरम मसाल्यांचा वापर केला जातो. काळं चिकनसाठी तुम्ही घट्ट किंवा थोडी पातळ ग्रेव्ही तयार करू शकता.
गटारीसाठी स्पेशल सुकं चिकन तयार करू शकता. या रेसिपीसाठी दही, लाल तिखट, कोथिंबीर, लाल मिरचीचा वापर केला जातो. याची ग्रेव्ही सुक्या पद्धतीची तयार करू शकता.
कोल्हापूरातील तांबडा-पांढरा रस्सा संपूर्ण महाराष्ट्रात आवडीने खाल्ला जातो. यंदाच्या गटारीला तुम्ही पांढरा रस्सा तयार करू शकता. यासोबत सोलकढी, जिरा राइस आणि फ्राय चिकनही ट्राय करा.