स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही अंगरखा स्टाइल सूट परिधान करु शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ओढणी, पायजमा आणि ज्वेलरी देखील घालता येईल.
सध्या सिल्क फॅब्रिक सूटचा ट्रेण्ड आहे. यंदाच्या 15 ऑगस्टला सिल्क फॅब्रिक सूट परिधान करू शकता. यावर तिरंग्याच्या रंगातील कॉम्बिनेशनने लूक पूर्ण करू शकता.
स्वातंत्र्य दिनासाठी एखाद्या कार्यक्रमाला जाणार असल्यास पांढऱ्या रंगातील कॉटन सूट परिधान करू शकता. या लूटवर हिरव्या रंगातील ऑर्गेंजा ओढणी दिली आहे.
तिरंग्यातील शांतीचे प्रतीक दर्शवणारा पांढऱ्या रंगातील सूट तुम्ही यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त परिधान करू शकता. यावर निळ्या रंगातील प्रिंटेट डिझाइन करण्यात आली आहे.
पांढऱ्या रंगातील सूटवर मल्टीकलर ओढणीने स्वातंत्र्य दिनानिमित्तचा लूक पूर्ण करू शकता. यावर नारंगी अथवा हिरव्या रंगातील ज्वेलरी ट्राय करू शकता.
स्वातंत्र्य दिनासाठी पांढऱ्या रंगाच्या शेड्समधील ऑर्गेंजा साडी नेसू शकता. शाळेत अथवा महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले असल्यास ऑर्गेंजा साडी बेस्ट आहे.
सिंपल आणि सोबर लूकमध्येही चारचौघांमध्ये उठून दिसायचे असल्यास स्वातंत्र्य दिनावेळी चिकनकारी सूट परिधान करु शकता.
स्वातंत्र्य दिनामित्त एखाद्या फंक्शनला जाण्यासाठी सिक्विन वर्क करण्यात आलेला सूट ट्राय करा. यावर मोत्याची ज्वेलरी शोभून दिसेल.