हरिद्वारच्या परिसरात गणेश घाट आहे. येथेच गणपतीची एक विशालकाय मुर्ती देखील आहे. या घाटावर केलेल्या स्नानाचे महात्म फार मोठे आहे. या घाटाचे वर्णन धार्मिक ग्रंथांत करण्यात आलेला आहे.
कुंदापूरपासून गोकर्णकडे जाताना शिराळी गणेश तीर्थ लागते. येथे महागणपतीची मूर्ती आणि मंदिर आहे.
सासवडमधील कऱ्हेच्या काठी अनेक तीर्थे आहेत. येथूनच पश्चिमेला 5 मैल दूरवर गणेशगया आहे. हे पितृतीर्थ असून येथे 18 पावले उमटलेली एक गणेशशीला आहे.
आंवढ्या नागनाथांचे स्थान जे दारुकावनांत म्हणजे सौराष्ट्रातील द्वारकेजवळ आहे. येथील जोशी गल्लीमध्ये तीर्थ नावाच्या विहिरीजवळच गणेश तीर्थ हे मुख्य तीर्थ आहे.
मानवत रोड स्टेशनपासून 20 मैलांवर पूर्ववाहिनी गोदावरी नदीत एक गणपती मंदिर असून तेथील अष्टतीर्थात गणेश तीर्थाची गणना होते.