कारल्याची भाजी बहुतांशजणांना आवडत नाही. कारण याच्या कडवटपणामुळे काहीजण खाणे टाळतात.अशातच कारल्याची भाजी कडू होणार नाही यासाठी काय करावे हे पुढे जाणून घेऊया.
कारल्याचे पातळ स्लाइस करुन घ्या. यामध्ये मीठ घालून 10-15 मिनिटे ठेवा. यानंतर कारल्याची भाजी धुवून घ्या. यामुळे भाजीतील कडवटपणा दूर होईल.
चिरलेल्या कारल्याची भाजी 10-15 मिनिटे दही किंवा ताकामध्ये बुडवून ठेवा. यामुळे कारल्याचा कडवटपणा दूर होण्यास मदत होईल.
हळद आणि लिंबाचा वापर करुन कारल्याचा कडवटपणा दूर करू शकता.
कारल्यामधील कडवटपणा दूर होण्यासाठी भाजी उकळवून घ्या.
कारल्याची भाजी तयार करताना थोडेशी साखर किंवा गूळ मिक्स करू शकता.
कारल्याची भाजी कापल्यानंतर त्याला आलं-लसूणची पेस्ट लावून ठेवा. यामुळे कारल्याची भाजी कडवट होणार नाही.