टपरीवर मिळणारा झणझणीत वडापाव आठवला की तोंडाला पाणी सुटतं. तोच चवदार वडापाव आपण घरी कसा बनवायचा हे जाणून घ्या.
Image credits: social media
Marathi
वड्यासाठी बटाट्याचा मसाला तयार करा
४-५ उकडलेले बटाटे मॅश करा. कढईत थोडं तेल गरम करा. मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, आले-लसूण-हिरव्या मिरच्या यांची पेस्ट टाका. मग त्यात मॅश केलेले बटाटे घालून मीठ टाकून छान परतून घ्या.
Image credits: social media
Marathi
वड्यासाठी बेसनचं पीठ तयार करा
एका बाऊलमध्ये १ कप बेसन घ्या. त्यात मीठ, चिमूटभर हळद, थोडं लसूण आणि मिरची पावडर, आणि थोडं बेकिंग सोडा टाका. पाणी घालून गटगटीत पीठ तयार करा.
Image credits: social media
Marathi
वडे तळा आणि तयार करा
बेसनाच्या पिठात बटाट्याचा गोळा बुडवून घ्या. कढईत तेल गरम करा आणि वडे खरपूस तळून घ्या. सर्व वडे टिशूवर काढून ठेवा.
Image credits: social media
Marathi
वडापावसाठी लसूण चटणी बनवा
थोडा भाजलेला खोबरं, लसूण पाकळ्या, लाल मिरच्या आणि मीठ एकत्र वाटून कोरडी चटणी तयार करा. हव असल्यास त्यात थोडं तेल घालू शकता.