पावसात अंगात थंडी भरते तेव्हा गरमागरम, कडक चहा हाच सर्वोत्तम साथीदार असतो. घरच्या घरी कमी वेळात आणि थेट चहा स्टॉलसारखा कडक चहा कसा करायचा ते जाणून घेऊयात.
Image credits: Social media
Marathi
साहित्य
२ कप पाणी, १ कप दूध, २ चमचे साखर, २ चमचे टीपावडर, १/२ इंच आद्रक, ४-५ तुळशीची पानं
Image credits: Social media
Marathi
पाणी उकळवून घ्या
एका पातेल्यात २ कप पाणी गरम करायला ठेवा. त्यात लगेचच ठेचलेलं आले आणि तुळशीची पानं टाका. हे मिश्रण २-३ मिनिटं उकळू द्या जेणेकरून त्याचा अर्क पाण्यात उतरतो.
Image credits: Social media
Marathi
चहा पावडर टाकणे
पाणी उकळल्यावर त्यात २ चमचे टीपावडर टाका. चहा जरा जास्त वेळ उकळा म्हणजे त्याचा रंग आणि चव चांगली येते. साधारण २-३ मिनिटं चहा उकळवा.
Image credits: Social media
Marathi
दूध, साखर टाकून सर्व्ह करा
आता त्यात १ कप दूध आणि २ चमचे साखर घालून पुन्हा २-३ मिनिटं चहा चांगला उकळवा. चहा वर येईपर्यंत गॅस मंद ते मध्यम ठेवा. चहा तयार झाला की गाळणीने गाळून कपात ओता.