अंडा भुर्जी हा पटकन बनवता येण्यासारखा पदार्थ आहे. हा पदार्थ सर्वांना आवडत असून त्याला बनवण्यासाठी ५ ते १० मिनिटे खूप झाले.
2 अंडी, 1 मध्यम कांदा (चिरलेला), 1 टमाटा (चिरलेला), 1-2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या), चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल, कोथिंबीर सजावटीसाठी
कढईत तेल गरम करून त्यात कांदा आणि हिरवी मिरची परता. कांदा सोनेरी झाल्यावर टमाटे घाला आणि मऊ होईपर्यंत परता.
हळद, मीठ घालून मिक्स करा. अंडी फोडून कढईत घाला आणि हलक्या हाताने ढवळा.
2-3 मिनिटांत शिजल्यानंतर कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा. त्यानंतर पाव किंवा पोळीसोबत खायला भुर्जी तयार होऊन जाईल.