१ कप रवा (सूजी), २ टेबलस्पून मैदा, १/४ टीस्पून मीठ, पाणी, तळण्यासाठी तेल, २ कप कोथिंबीर, १ कप पुदिना पाने, २-३ हिरव्या मिरच्या, १ इंच आल्याचा तुकडा, १ टीस्पून जिरे
एका परातीत रवा, मैदा आणि मीठ एकत्र करून पाणी घालून घट्ट मळून घ्या. किमान २० मिनिटे झाकून ठेवा. नंतर छोटे गोळे करून पातळ आणि समान आकाराच्या पूऱ्या लाटून घ्या.
गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. निथळून हवाबंद डब्यात ठेवा. उकडलेले बटाटे कुस्करून घ्या.
त्यात मूग/चणे, तिखट, चाट मसाला, धणे-जिरे पूड, काळे मीठ आणि मीठ घालून चांगले मिसळा. हे मिश्रण पुरीमध्ये भरण्यासाठी तयार आहे.
कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, आले आणि जिरे मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात काळे मीठ, चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पूड आणि मीठ घालून परत मिक्स करा.
हे मिश्रण ४ कप थंड पाण्यात मिसळा आणि गाळून घ्या. पाणी अधिक तिखट किंवा आंबट हवे असल्यास मसाला प्रमाण बदलू शकता.
एका पुरीला मधे हलकीशी फोड द्या. त्यात मसाला सारण भरा.झणझणीत पाणीपुरीच्या पाण्यात बुडवून तोंडभर चव घ्या!