भेंडीची भाजी बहुतांशजण आवडीने खातात. याचा आरोग्याला फायदा होतो. भेंडीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी अशा प्रकारची पोषण तत्त्वे असतात.
भेंडीची भाजीच नव्हे तर याचे पाणी देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
भेंडीमध्ये फायबर खूप असतात यामुळे वजन कमी होते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी भेंडीच्या पाण्याचे सेवन करू शकता. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
भेंडीमधील अँटीऑक्सिडेंट्समुळे शरीरातील हानिकारक फ्री रेडिकल्स बाहेर पडण्यास मदत होते.
भेंडीच्या पाणीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.