फुल फॅट दूध – १ लिटर, साखर – १/२ कप, वेलची पावडर – १/२ टीस्पून, केशर – थोडं, सुके मेवे – बदाम, काजू, पिस्ता, कॉर्नफ्लोअर – १ टेबलस्पून
एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करा. मध्यम आचेवर सतत ढवळत दूध अर्धं होईपर्यंत आटवा.
आटवलेल्या दुधात साखर, केशर आणि दूध पावडर (हवं असल्यास) घाला.
कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून ते मिश्रण दुधात हळूहळू घालावं. यामुळे मिश्रण दाट होतं आणि क्रीमी टेक्सचर मिळतं.
शेवटी बारीक चिरलेला मेवा व वेलची पावडर घालावी. अजून ५ मिनिटं उकळून गॅस बंद करा.
मिश्रण थंड झाल्यावर कुल्फी मोल्डमध्ये ओता. झाकण लावून ८-१० तास फ्रीजरमध्ये गोठवा.
मोल्ड बाहेर काढा, २ मिनिटं बाहेर ठेवा आणि हळूच कुल्फी बाहेर काढा. वरून थोडं ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा!
दूध खूप आटवल्यामुळे रिच आणि मस्त चव येते. हवं असल्यास मैंगो पल्प, चॉकलेट सिरप घालून वेगवेगळ्या फ्लेवर्स ट्राय करू शकता