२ मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, १/२ कप साखर, १/२ टीस्पून मीठ, १/२ टीस्पून जिरे पूड, ८-१० पुदिन्याची पाने थंड पाणी, बर्फाचे खडे
कैऱ्यांना धुऊन घेऊन प्रेशर कुकरमध्ये २ शिट्या होईपर्यंत उकळा किंवा पाण्यात उकळून नरम होईपर्यंत शिजवा.
उकडलेली कैरी थंड झाल्यावर तिची साल आणि बिया काढून फक्त गर बाजूला ठेवा.
मिक्सरमध्ये कैरीचा गर, साखर, मीठ, जिरेपूड आणि पुदिन्याची पाने एकत्र करून पेस्ट तयार करा.
ही पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढून त्यात थंड पाणी घाला आणि नीट मिसळा. हवं असल्यास गाळूनही घेऊ शकता.
एका ग्लासमध्ये हे थंडगार पन्हं ओता, बर्फाचे खडे टाका आणि सजवण्यासाठी वरून थोडं जिरेपूड भुरा.
केस कुरळे होण्यासाठी काय करायला हवं? या घरगुती उपायांची होईल मदत
अक्षय्य तृतीयेला बायकोला गिफ्ट करा हे सुंदर मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट डिझाइन्स
सनस्क्रिनशिवाय UV किरणांपासून त्वचेचे होईल संरक्षण, लावा या 5 गोष्टी
कोणती फळे खाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते? वाचा टीप्स