राईची पावडर आणि केळ्याच्या सालीचा वापर मिरचीच्या झाडासाठी खत म्हणून वापरू शकता.
राईच्या पावडरमध्ये नाइट्रोडन, फॉस्फोरस आणि पोटॅशियम असते. यामुळे मिरचीच्या झाडाची मूळ मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय झाडाची वाढही वेगाने होते.
मिरचीच्या झाडाच्या वाढीसाठी राईची पावडर 24 तास पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर मातीत मिक्स करुन त्यावर पुन्हा एक लेअर माती घाला.
केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, फॉस्फोरस असते. यामुळे मिरचीचे झाड वाढण्यास मदत होते.
केळ्याची साल सुकवून पावडर तयार करा. ही पावडर मातीत मिक्स करुन घालू शकता. याशिवाय गाईचे शेणही मिरचीच्या झाडासाठी बेस्ट पर्याय आहे.
अंड्याचे कवच मातीत मिक्स केल्याने मिरचीच्या झाडाला कॅल्शियम मिळेल. यामुळे झाडाची वाढ होण्यास मदत होईल.