आवळा-बीटाचा ज्यूस किडनीसाठी फायदेशीर ठरतो. याचे सेवन केल्याने शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडतात.
दररोज सकाळी उपाशी पोटी आवळा-बीटाचा ज्यूस प्यायल्याने फुफ्फुसांमधील घाण बाहेर पडण्यास मदत होईल. याशिवाय मेटाबॉलिज्मही बूस्ट होतो.
आवळ्याचे सेवन केल्याने शौचास व्यवस्थित होणे आणि पोटासाठी फायदेशीर ठरते.
बीट आणि आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे अपचनाची समस्या उद्भवत नाही.
बीटामध्ये बीटालेन अँटीऑक्सिडेट असते, जे यकृताचे कार्य बूस्ट करण्यास मदत करते. यामुळे यकृतामधील अतिरिक्त टॉक्सिन्स बाहेर पडतात.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे त्वचेमधील कोलेजनचे प्रोडक्शन वाढवण्यास मदत करते. यामुळे त्वचा कोमल होण्यास मदत होते.
बीट आणि आवळ्याच्या ज्यूसचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.