Marathi

घरीच पार्लरसारखं फेशियल कस करावं, प्रोसेस जाणून घ्या

Marathi

चेहरा स्वच्छ करा

  • सर्वप्रथम चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा. 
  • घरगुती उपाय: 1 चमचा बेसन + गुलाब जल मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि सौम्य मसाज करा. हे चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि घाण दूर करतं.
Image credits: instagram
Marathi

स्क्रबिंग (Exfoliation)

  • मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रब करणं अत्यावश्यक आहे. 
  • 1 चमचा तांदळाचं पीठ + 1 चमचा दूध मिक्स करून 2-3 मिनिटं चेहऱ्यावर हलक्या हाताने घासा. त्वचेला नैसर्गिक तेज प्राप्त होतं.
Image credits: instagram
Marathi

स्टीम घ्या (Steaming)

  • गरम पाण्याच्या वाफेने चेहऱ्याचे पोर्स उघडतात. 
  • 5-7 मिनिटं गरम पाण्याच्या वाफेमध्ये चेहरा धरून ठेवा. ब्लॅकहेड्स काढायला मदत होते.
Image credits: instagram
Marathi

बर्फाने त्वचा ताजीतवानी करा

  • एका कापडात बर्फ गुंडाळून चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा. 
  • यामुळे त्वचेला टाईटनेस येतो आणि थकवा दूर होतो.
Image credits: instagram
Marathi

फेस पॅक लावा

  • 1 चमचा मुलतानी माती + 1 चमचा चंदन + थोडंसं दही मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 
  • 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. 
  • हे त्वचा उजळवण्यास आणि डाग कमी होण्यास मदत करतं.
Image credits: instagram
Marathi

मॉइश्चरायझिंग विसरू नका

शेवटी हलकं मॉइश्चरायझर किंवा एलोवेरा जेल लावा. हे त्वचेला मऊ, टवटवीत आणि हायड्रेटेड ठेवतं.

Image credits: instagram

Shravan 2025 : श्रावणी शनिवारच्या उपवासासाठी तयार करा या 5 रेसिपी

Raksha Bandhan 2025 : भावा-बहिणींसाठी शुभेच्छापत्र, घट्ट होईल नाते

रोज भात खाल्यामुळं वजन कमी होतं का, फायदे जाणून घ्या

वेस्टर्न आउटफिटवर ट्राय करा हे 5 Funky Earrings, 200 रुपयांत करा खरेदी