विकट संकष्टी चतुर्थी 27 एप्रिल, शनिवारी आहे. या व्रतामध्ये श्री गणेश आणि चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास जीवनात सुख-समृद्धी कायम राहते.
विकट संकष्टी चतुर्थीनिमित्त भगवान श्री गणेशाच्या मंत्रांचा यथाविधी जप करा. मंत्रोच्चारासाठी रुद्राक्ष जपमाळ वापरता येते. यामुळे तुमचे जीवन आनंदी होईल.
या व्रतामध्ये श्रीगणेशाची पूजा केल्यानंतर अन्नदानही केले जाते. या दिवशी जर तुम्ही श्री गणेशाला बेसनाचे लाडू किंवा बुंदीचे लाडू अर्पण केले तर तुम्हाला लवकरच शुभ फळ प्राप्त होतील.
संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये गणपती अर्थशीर्षाचे पठण करावे. यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या आपोआप दूर होऊ शकतात आणि ग्रहांच्या अशुभ परिणामांपासूनही तुमचे रक्षण होईल
या दिवशी गरजूंना दान देण्याचेही विशेष महत्त्व आहे. चतुर्थीच्या व्रतामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गरजू लोकांना अन्न, कपडे इत्यादी दान करू शकता.
विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीला कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक करावा. यादरम्यान ओम गं गणपतयै नमः या मंत्राचा जप करत राहा. यामुळे शुभ परिणाम प्राप्त होतील.