थंडीत डोळे कोरडे होण्याची समस्या बहुतांशजणांना उद्भवली जाते. पण याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. थंडीत डोळे कोरडे होण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी पुढे पाहूया खास उपाय…
कोरड्या डोळ्यांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी ग्रीन टी कामी येईल. पाण्यात बुडवलेली ग्रीन टी ची बॅग फेकून देण्याएवजी डोळ्यांवर लावू शकता. यामुळे डोळे कोरडे होणार नाहीत.
डोळ्यांचा कोरडेपणा आणि अधिक थकवा जाणवत असल्यास दूधाची मलई आणि शुद्ध तूप करून डोळ्यांना थोडावेळ लावून ठेवा. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
थंडीत डोळ्यांच्या कोरडेपणाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी आणि शरिर हाइड्रेट राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करा. बहुतांशजण थंडीत पाणी पिण्याचे प्रमाण कमी करतात.
डोळ्यांची होणारी जळजळ, खाज किंवा डोळे कोरडे होण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी दिवसातून तीन ते चार वेळा पाण्याने चेहरा धुवा. याशिवाय उन्हात जाताना डोळ्यांवर चष्मा लावा.