चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असल्याच्या समस्येचा सामना करता का? यामुळे त्वचेचे सौंदर्य बिघडण्यासह त्वचेवर कधीकधी काळे डागही पडले जातात.
पिंपल्स येऊ नये म्हणून बाहेरून आल्यावर चेहरा स्वच्छ आणि सामान्य तापमानाच्या पाण्याने धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाते. दिवसातून 3-4 वेळा चेहरा धुवावा.
चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये यासाठी किंवा वारंवार येत असल्यास ग्रीन टी चे सेवन करावे. ग्रीन टीमधील अँटीऑक्सीडेंट गुण हे पिंपल्सला प्रतिबंध करण्यास मदत करतात.
आहारामध्ये पौष्टिक आणि सकस घटक असलेले पदार्थ घ्यावेत. खासकरून ग्लायसेमिक इंडेक्स असलेला आहार घ्यायला प्राधान्य द्यावे जेणेकरून त्वचेला पोषण मिळेल.
पिंपल्स आले असल्यास त्वचेवर अत्यंत हळुवारपणे मीठ आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण लावावे आणि काही काळ ठेऊन ते स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे.
पिंपल्स आले असल्यास ते दाबून काढू नयेत. यामुळे त्वचेवर काळे डाग पडतात.