पावसाळ्याच्या दिवसात हेल्दी सूप प्यायचे असल्यास मशरुम सूप तयार करू शकता. पुढे जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर...
200 ग्रॅम मशरुम, दोन चमचे तूप, कांदा, लसूण, काळी मिरी पावडर, कॉर्न फ्लॉवर, लिंब, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
मशरुम सूप तयार करण्यासाठी सर्वप्रथम मथरुम स्वच्छ धुवून घ्या. यानंतर मशरुचे बारीक तुकडे करा.
गॅसवर पॅन गरम झाल्यानंतर तेलात कांदा आणि लसूण टाकून भाजून घ्या. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर त्यामध्ये मशरुमचे बारीक केलेले तुकडे टाका.
मशरुम थोडावेळ शिजवल्यानंतर त्यावरुन काळी मिरी पावडर आणि मीठा टाका. काही वेळाने मशरुमला पाणी सुटण्यास सुरुवात होईल.
मशरुममधील पाणी सुकेपर्यंत शिजवा. यामधील पाणी सुकल्यानंतर थोड्या मशरुमची मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
पेस्ट पॅनमध्ये टाकून त्यामध्ये दोन कप पाणीही टाका. सूप उकळण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये कॉर्न फ्लोर मिक्स करा.
सूप व्यवस्थितीत शिजल्यानंतर त्यावरुन लिंबाचा रस, कोथिंबीर टाकून गार्निशिंग केल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा. यामध्ये व्हाइट क्रिमही मिक्स करू शकता.
पिझ्झासाठी वापरल्या जाणाऱ्या Oregano चे आरोग्यदायी फायदे
मैत्रीणीच्या लग्नसोहळ्यासाठी सेलिब्रेटींसारखे 8 लूक, दिसाल कातील
अनंत अंबानीच्या लग्नात इशाने घातला मौल्यवान नेकलेस, खासियत काय?
नीता अंबानींची बनारसचा वारसा असणारी अनोखी साडी, जाणून घ्या खासियत