Lifestyle

Chocolate Donut Recipe

ख्रिसमसला मुलांसाठी बनवा Yummy चॉकलेट डोनट

Image credits: social media

सामग्री

दोन कप मैदा, दीड कप कोको पावडर, तीन चतुर्थांश कप साखर, दोन चमचा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दीड चमचा मीठ, तीन चतुर्थांश ताक, दोन अंडी, दोन चमचे लोणी, दोन चमचे व्हेनिला एसेंस.

Image credits: social media

चॉकलेट सॉस साहित्य

एक कप पिठीसाखर, चार चमचे कोको पावडर, चार मोठे चमचे दूध, एक चमचा व्हेनिला एसेंस.

Image credits: social media

रेसिपी

चॉकलेट डोनट तयार करण्यासाठी सर्वप्रथम ओव्हन 350 डिग्री फॉरेन्हाइटवर ( 175 डिग्री सेल्सिअस) गरम करा.

Image credits: social media

डोनट सॉस

एका बाऊलमध्ये मैदा, कोको पावडर, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ व्यवस्थितीत मिक्स करून घ्या. यानंतर तयार करण्यात आलेला डोनट सॉस गाळणीने गाळून वेगळ्या भांड्यात ठेवा. 

Image credits: social media

डोनट मिश्रण

दुसऱ्या भांड्यात ताक, अंडी, लोणी आणि व्हेनिला एसेंस एकत्रित करून सर्व सामग्री व्यवस्थितीत फेटून घ्या.

Image credits: social media

असे तयार करा डोनट

चॉकलेट डोनटसाठी डोनट पॅनवर लोणीचे काही थेंब टाका. डोनटसाठी तयार करण्यात आलेले पीठ चमचाने पाइपिंग बॅगमध्ये भरून झाल्यानंतर डोनट पॅनमध्ये सोडा.

Image credits: social media

बेकिंग प्रक्रिया

गरम केलेल्या ओव्हनमध्ये पॅन ठेवा व 10-12 मिनिटे डोनट भाजण्यासाठी ठेवा. टूथपिक डोनटमधून सहज बाहेर आल्यास तो तयार झालाय हे समजा. ओव्हनमधून डोनट बाहेर काढल्यानंतर थंड होऊ द्या.

Image credits: social media

चॉकलेट सॉस

 एका मोठ्या वाटीत पिठीसाखर, कोको पावडर, दूध आणि व्हेनिला एसेंस एकत्रित करून व्यवस्थितीत मिक्स करा. सॉस पातळ हवा असल्यास आवश्यकतेनुसार दूध मिक्स करा.

Image credits: social media

डोनटसाठी गार्निशिंग

डोनट थंड झाल्यानंतर प्रत्येक डोनट ब्रेड चॉकलेट सॉसमध्ये बुडवून बाहेर काढा. या डोनटवर तुम्ही चॉकलेट चिप्स स्प्रिंकल करू शकता. 

Image credits: social media

ख्रिसमससाठी खास डोनट

डोनटवर चॉकलेट सॉस व्यवस्थितीत सेट झाल्यानंतर एका प्लेटमध्ये डोनट काढून मुलांना सर्व्ह करा. ख्रिसमसनिमित्त मुलांसाठी चॉकलेट केक ऐवजी यंदा चॉकलेट डोनटची ही रेसिपी नक्की ट्राय करा. 

Image credits: social media