मूळव्याधाचा त्रास होतोय? हे फूड्स खाणे टाळा अन्यथा...
डेअरी प्रोडक्ट्सचे अत्याधिक प्रमाणात सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होते, जी मूळव्याधाच्या त्रासाला कारणीभूत ठरू शकते. यामुळे दूध, दही, चीजसारखे पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत.
मूळव्याधाचा त्रास होत असल्यास मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे. यामुळे मूळव्याधाचा त्रास अधिक वाढला जाऊ शकतो. याशिवाय रक्तस्रावाची समस्याही वाढली जाऊ शकते.
लाल मांसमध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावली जाते व बद्धकोष्ठतेची स्थिती निर्माण होते. अशातच मूळव्याधाचा त्रास वाढला जाऊ शकतो.
प्रोसेस्ड फूडमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. पॅकेजिंग पदार्थ दीर्घकाळ टिकून राहावेत म्हणून त्यावर काही प्रक्रिया केल्या जातात. मूळव्याधाचा त्रास होत असल्यास प्रोसेस्ड फूड खाणे टाळा.
व्हाइट ब्रेड, पास्ता आणि बेक करण्यात आलेल्या प्रोसेस्ड धान्यात फायबरची कमतरता असते. हे पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
तळलेले पदार्थ खाल्ल्याने ते शरीराला पचवण्यास फार कठीण होऊ शकते. अशातच पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. परिणामी मूळव्याधाचा त्रास वाढला जाऊ शकतो.
कॉफी आणि कॅफेनयुक्त पेयांचे सेवन केल्याने शरीरात डिहाइड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच मूळव्याधाचा त्रास वाढू शकतो. अथवा काही व्यक्तींना पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
मूळव्याध आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. तसेच धान्य, फळे, हिरव्या भाज्यांचे देखील भरपूर प्रमाणात सेवन करावे.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.