काचेसारखा चमकदार चेहरा हवाय? मग वापरा ही बहुगुणी आयुर्वेदिक पावडर.
चेहऱ्यावरील डाग, मुरुमांच्या समस्येतून सुटका हवी असल्यास बहुगुणी त्रिफळाचे फेस पॅक वापरा. आवळा, हिरडा आणि बेहडापासून तयार केली जाणारी औषधी पावडर म्हणजे त्रिफळा चूर्ण.
त्रिफळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आहेत. जे त्वचेच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून बचाव करू शकतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या व वृद्धत्वाची लक्षणेही कमी होऊ शकतात.
त्रिफळामध्ये कित्येक प्रकारचे फायटोकेमिकल्स आहेत. जे त्वचेचं संरक्षण करण्यासह मेलेनिनचे उत्पादन कमी करण्यासही मदत करतात. यामुळे हायपरपिगमेंटेशनची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
त्वचेतील कोलेजनची निर्मिती वाढवण्यासाठी त्रिफळा अतिशय लाभदायक आहे. यामुळे त्वचा सैल पडत नाही तसेच त्वचा तरुणही दिसते. कोलेजन हे प्रोटीन त्वचेसाठी अतिशय आवश्यक आहे.
प्रदूषण, वाढते वय किंवा ब्युटी केअर रुटीनमधील चुकांमुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्रिफळाचे फेस पॅक वापरा.
त्रिफळाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यास मदत मिळू शकते. कारण यातील फायटोकेमिकल्स मेलेनिनचे उत्पादन कमी करतात. तसेच त्वचा चमकदार व सतेजही दिसेल.
सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्वचेवरील डाग, सनबर्नची समस्या दूर करण्यासाठी त्रिफळा चूर्णचा वापर करून पाहू शकता.
मृत त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे त्रिफळा. केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी मृत त्वचेची समस्या दूर करण्यासाठी त्रिफळा स्क्रब वापरू शकता.
आपल्या आवश्यकतेनुसार त्रिफळा पावडर - अॅलोव्हेरा जेल एकत्रित मिक्स करून पेस्ट तयार करा. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.