उपवासाचा बटाटावडा तयार करण्यासाठी तुम्हाला उकडलेले बटाटे स्मॅश करुन त्यामध्ये कोथिंबीर, मिरची, वरीचे पीठ, साबुदाणा पीठ वापरावे लागेल. अगदी झटपट आणि कमी वेळात होणारा हा पदार्थ आहे.
उपवासाचे थालीपीठ करण्यासाठी शेंगदाण्याचे कूट, साबुदाणा पीठ, हिरव्या मिरची, कोथिंबीरचा वापर करावा लागेल.
उपवासाला बहुतांशजणांच्या घरी वरीचा भात तयार केला जातो. यासाठी वरीचा तांदूळ, तूप, जिरे, मिरची, शेंगदाण्याचा कूट अशा साहित्याचा वापर करावा लागतो. या भातासोबत शेंगदाण्याची आमटी खातात.
उपवासासाठी झटपट तयार होणारा डोसासाठी वरी, शेंगदाणे, उकडलेला बटाटा, दही, हिरवी मिरचीचा वापर करावा लागेल. या डोसासोबत शेंगदाण्याची अथवा नारळाची चटणीचे सेवन करू शकता.
उपवासासाठी झटपट तयार होणारा पदार्थ म्हणून रताळ्याचे गोड काप करु शकता. यासाठी रताळे, किसलेला नारळ, कोथिंबीर असे साहित्य वापरू शकता.