येत्या 30 मार्चला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी अशाप्रकारचा पारंपारिक लूक करू शकता.
गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला जाणार असाल तर अशी नऊवारी साडी नेसू शकता. यावर हातात हिरव्या, गोल्डन बांगड्या आणि गोल्डन ज्वेलरीने लूक पूर्ण करा.
यंदा लग्नानंतर पहिलाच गुढीपाडवा साजरा करणार असाल तर असा शाही लूक करू शकता.
गुढीपाडव्याला महिला वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसून नटतात. यावेळी शोभायात्रेला जाणार असाल तर असा अस्सल मराठमोळा लूक ज्वेलरीसह पूर्ण करा.
पिवळ्या आणि लाल रंगात काठ असणाऱ्या साडीमध्ये अंकिता लोखंडे फार सुंदर दिसतेय. असा लूक गुढीपाडव्याच्या सणावेळी करू शकता.