चाणक्य म्हणतात, "स्वतःच्या कष्टाने उभे राहिलेलं आयुष्यच खऱ्या अर्थाने समाधान देतं." कोणत्याही परिस्थितीत इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या मेहनतीने यश मिळवा.
"कधीही आंधळेपणाने कोणावर विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक हसणारा मित्र नसतो." सच्चा मित्र आणि बनावट मित्र यांच्यातील फरक समजून घ्या. तुमच्या फायद्यासाठी जवळ येणाऱ्यांपासून सावध राहा
"शिक्षण हेच खरे धन आहे, जे कोणत्याही संकटात आपल्याला साथ देईल." दररोज काहीतरी नवीन शिका आणि स्वतःला सुधारत रहा.
"वेळेचा अपव्यय करणारा व्यक्ती कधीच मोठं यश मिळवू शकत नाही." आयुष्यात वेळेचे नियोजन करा आणि प्रत्येक क्षण सत्कारणी लावा. आळशी राहू नका; सतत मेहनत करा आणि उद्दिष्टावर लक्ष ठेवा.
"स्वतःच्या गोपनीय गोष्टी कोणालाही सांगू नका, अन्यथा त्या तुमच्याच विरोधात वापरल्या जातील." आर्थिक स्थिती, कौटुंबिक समस्या आणि भविष्यातील योजना गुप्त ठेवा.