Lifestyle

गिरगावमध्ये गुढीपाडव्याचा जल्लोष, पाहा सणाचे खास PHOTOS

Image credits: Instagram

गिरगावमधील गुढीपाडवा

यंदाच्या गिरगावमधील गुढीपाडव्याला दरवर्षीप्रमाणे जल्लोष दिसून आला. फोटोमधील चिमुरड्याने शिवाजींच्या मावळ्याचा लुक केला होता.

Image credits: Soham Pabrekar

मल्लखांबची कसरत

गिरगावात गुढीपाडव्यावेळी मल्लखांबची कसरत करतानाचा फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. मल्लखांब करणाऱ्या तरुणींनी मराठमोळा लुक केल्याचे दिसून येत आहे. 

Image credits: Soham Pabrekar

गुढीपाडव्यासाठी खास लुक

गिरगावात गुढीपाडव्याच्या शोभायात्रेसाठी महिला पारंपारिक रुपात वस्र परिधान करतात. यावेळी प्रत्येक महिला-तरुणीचा लुक पाहण्याजोगा असतो. 

Image credits: Soham Pabrekar

चिमुकल्याचा जय मल्हारचा लुक

गिरगावाच्या गुढीपाडव्यानिमित्त काढल्या जाणाऱ्या शोभायात्रेत चिमुकल्याने जय मल्हारचा लुक केला होता.

Image credits: Soham Pabrekar

चिमुकलीचा हटके स्वॅग

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत चिमुकलीचा हटके स्वॅग पाहायला मिळाला. पारंपारिक लुकसह चिमुकलीच्या गुलाबी रंगातील गॉगलकडे सर्वांचे लक्ष वेधले.

Image credits: Soham Pabrekar

गुढीपाडव्यातील रणरागिणी

गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त रणरागिणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

Image credits: Soham Pabrekar

शाही थाट

गिरवागामधील गुढीपाडव्यासाठी तरुणीने शाही थाट केल्याचे दिसून आले. बुलेटवरुन निघणाऱ्या रॅलीमध्ये अनेक तरुणी आणि महिलांचा शाही थाट पाहायला मिळाला. 

Image credits: Soham Pabrekar

पारंपरिक लुक

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत महिला आणि पुरुष मंडळीचा मराठमोठा पारंपारिक लुक पाहायला मिळतो. 

Image credits: Soham Pabrekar