केस मूळापासून मजबूत आणि मऊ होण्यासाठी महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट घेतात. अशातच केसांची चमक वाढवण्यासाठी ग्रीन टी आणि तांदळाचे पाणी वापरुन पुढील काही हेअर मास्क तयार करू शकता.
तांदळाच्या पाण्यामध्ये अॅमिनो अॅसिड आणि इनोसिटोल असते जे केसांना मूळापासून मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय ग्रीन टी मुळे केस वाढण्यास मदत होते.
केसांना नैसर्गिक पद्धतीने चमक आणण्यासाठी ग्रीन टी, तांदळाचे पाणी आणि एलोवेरा जेलचा हेअर मास्क तयार करू शकता. हेअर मास्क केसांना 20 मिनिटे लावल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
मधामध्ये केस हायड्रेट ठेवण्यासह त्यांची चमक वाढवण्याचे गुणधर्म असतात. अशातच ग्रीन टी, तांदळाचे पाणी आणि मधाचा हेअर मास्क तयार करा. यानंतर हेअर मास्क केसांना 20 मिनिटे लावून ठेवा.
एका बाऊलमध्ये दोन अंडी, ग्रीन टी आणि तांदळाचे पाणी घेऊन सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा. अशाप्रकारे हेअर मास्क तयार होईल. हेअर मास्क 20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर केस धुवा.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.