पार्टीसाठी मोरपिशी रंगातील क्रश्ड स्टाइल साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रस्ट रंगातील ब्लाऊन छान दिसेल. अशाप्रकारच्या साडी नेहमीच क्लासी लुक देतात.
गोल्डन रंगातील सॅटिन साडी दिव्यांकावर फार सुंदर दिसतेय. सॅटिन कापडातील प्रत्येक ड्रेस किंवा साडी रॉयल लुक देतो. या साडीवर मोत्याची ज्वेलरी शोभून दिसेल.
दिव्यांकासारखी लहरिया डिझाइन साडी कोणत्याही कार्यक्रमावेळी नेसू शकता. अशाप्रकारची साडी मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
पेस्टल रंगातील बॉर्डर वर्क सिल्क साडी कोणत्याही फंक्शनवेळी सुंदर लुक देईल. अशाप्रकारची साडी 3 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
साडी नेसण्याची फार आवड असल्यास चिकनकारी वर्क केलेल्या साडीच्या वेगवेगळ्या डिझाइन ट्राय करू शकता. यामध्ये तुमचा रॉयल लुक दिसेल.
वेगवेगळ्या डिझाइनमधील साडी नेसणे आवडत असल्यास बाटिक प्रिंट साडी एकदा नक्कीच ट्राय करुन पाहा. यामध्ये तुमचा लुक अधिक सुंदर दिसेल.
प्रत्येक महिलेला बनारसी साडी नेसणे अत्यंत आवडते. ऑफिस किंवा पार्टीसाठी बनारसी साडी बेस्ट पर्याय आहे. या साडीत लुक अधिक खुलला जातो.
गोल्डन वर्क असणाऱ्या जरी पॅटनमधील साडी लग्नसोहळ्यावेळी नेसल्यानंतर छान दिसेल. या साडीवर चोकर ज्वेलरी घालू शकता.
दिव्यांकासारखी गुलाबी रंगातील सॉफ्ट शिफॉन साडी तुम्ही कोणत्याही फंक्शनवेळी नेसू शकता. यावर कुंदन ज्वेलरी किंवा हेव्ही झुमके छान दिसतील.