गणपती बाप्पाला प्रिय आहेत 'मोदक' व्यतिरिक्त 'या' गोष्टी
गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात. हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण या व्यतिरिक्तही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या बाप्पाला खूप आवडतात. चला तर मग जाणून घेऊयात.
Lifestyle Sep 09 2024
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Getty
Marathi
मोतीचूर लाडू
गणपतीला मोतीचूर लाडू खूप आवडतात. असं मानलं जातं की, मोतीचूर लाडू अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि बाप्पााच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
Image credits: Getty
Marathi
खीर
तुम्ही गणपतीला खीरही अर्पण करू शकता. असं केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल आणि तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
Image credits: Getty
Marathi
केळीचा नैवेद्य
कोणत्याही पूजेत सर्व देवी-देवतांना केळी अर्पण केली जातात. गणपतीला केळी खूप आवडतात. केळी अर्पण केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.
Image credits: Getty
Marathi
मोदक
गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहेत. असं म्हटलं जातं की, बाप्पाला मोदक अर्पण केल्याने व्यक्तीवर गणपतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
Image credits: Getty
Marathi
नारळ
गणपतीला नारळही अर्पण केला जातो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश कल्पवृक्षात राहतात, असं मानलं जातं. नारळ गणेशाला अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो.