रोजच्या जेवणात भात आणि चपाती खाल्यामुळे वजन वाढत का, माहिती जाणून घ्या
Lifestyle Sep 30 2025
Author: vivek panmand Image Credits:Freepik
Marathi
कार्बोहायड्रेट्सचा जास्त वापर
भात आणि चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. शरीराला ऊर्जा मिळते पण जास्त प्रमाणात खाल्ले तर ते चरबी स्वरूपात साठवले जातात.
Image credits: Freepik
Marathi
पांढऱ्या तांदळाची समस्या
पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढते आणि भूक लवकर लागते. परिणामी जास्त खाणं होतं.
Image credits: social media
Marathi
गव्हाच्या चपातीतील ग्लूटेन
चपाती पोषक असली तरी त्यात ग्लूटेन असतं. काही लोकांना ते पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे पोट फुगणे किंवा वजन वाढल्यासारखं वाटू शकतं.
Image credits: Freepik
Marathi
प्रमाणाचा अभाव
भात आणि चपाती आहारात असले तरी त्याचं प्रमाण महत्त्वाचं आहे. जास्त प्रमाणात खाल्ले तर कॅलरीज वाढतात आणि वजनावर परिणाम होतो.
Image credits: Pinterest
Marathi
काय करावे?
पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राईस किंवा मिलेट्स वापरा. जेवणात भाज्या, डाळी, सॅलड यांचा समावेश करा. प्रमाण कमी ठेवा, एका वेळी जास्त भात किंवा चपाती टाळा. रात्री हलकं जेवण करा.