जर तुम्ही साडी आणि लेहेंगा घालून कंटाळला असाल, तर दांडिया किंवा गरबा नाईटसाठी सुंदर ड्रेस खरेदी करू शकता. हे घालून नाचायला कोणताही त्रास होणार नाही.
या ड्रेसमध्ये कलरफुल आणि पारंपरिक टचसोबत आधुनिक ट्विस्ट देण्यात आला आहे. कुर्त्यावर अनेक रंगांचा वापर करून एम्ब्रॉयडरी केली आहे. जीन्ससोबत तुम्ही असा कुर्ता घालू शकता.
जीन्ससोबत कलरफुल चोली घालून त्यावर तुम्ही अशा प्रकारचे लांब जॅकेट घेऊ शकता. यासोबत हेवी ज्वेलरी किंवा ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घाला. तुम्ही दांडियासाठी फ्यूजन लूक तयार करू शकता.
दांडिया आणि गरबा नाईटसाठी तुम्ही अशा प्रकारचा कलरफुल कुर्ता आणि धोती पायजमा ट्राय करू शकता. तुम्ही 2 हजार रुपयांच्या आत हा ड्रेस खरेदी करू शकता.
गरबा नाईटसाठी तुम्ही प्लाझोसोबत अशा प्रकारचा कलरफुल स्लीव्हलेस टॉप स्टाईल करू शकता. फ्यूजन लूकला पारंपरिक टच देण्यासाठी वेणी घाला आणि हेवी ज्वेलरी परिधान करा.
व्हायब्रंट रंगाच्या न्यूडल्स टॉपसोबत तुम्ही बुटीदार प्लाझो ट्राय करू शकता. या फ्यूजन लूकमध्ये चारचौघांच्या नजरा तुमच्याकडेच वळल्या जातील.
तुम्ही दांडियासाठी कलरफुल लेहेंगा देखील निवडू शकता. 9 कळी असलेला घेरदार लेहेंगा तुम्हाला पारंपरिक लूक देईल. तो ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीसोबत कॅरी करा.